१० वी नंतरच्या संधी

हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना नेहमीच पडलेला असतो. दहावीच्या प्रमाणपत्रावर आजच्या काळात नोकरी मिळणे किंवा व्यवसायासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे अवघड असल्यामुळे, दहावीच्या पुढेही आपले शिक्षण / प्रशिक्षण सुरु ठेवणे हे आजच्या माहितीच्या युगात क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे स्वत:ची क्षमता, आवड, इच्छा व प्राप्त संधी यांची सांगड घालून भावी आयुष्याची दिशा ठरविणे योग्य ठरते.

त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिक प्रयत्न फलदायी ठरतात. दहावीनंतर शिक्षणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण 

तांत्रिक शिक्षण 

उच्च माध्यमिक शिक्षण (कला, वाणिज्य, विज्ञान)

 १) व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कमी कालावधीत अर्थार्जन देणारे शिक्षण म्हणून ह्या शिक्षणाकडे पाहिले जाते. हे शिक्षण साधारणत: १ ते ३ वर्ष कालावधीचे असते. किमान कौशल्यावर आधारित हे शिक्षण असल्यामुळे हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना छोटासा व्यवसाय सुरु करता येतो तसेच उद्योगधंद्यामध्ये कुशल कारागीर म्हणून नोकरी करता येते.

 २) तांत्रिक शिक्षण कारखान्यांमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्य करण्यासाठी व मध्यम दर्जाचे उद्योगधंदे सुरु करण्यासाठी तांत्रिक शिक्षण हे उपयोगी ठरते. साधारणतः दहावीनंतर ३ ते ४ वर्षांचे अभ्यासक्रम असतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गणित व विज्ञान ह्या विषयात विद्यार्थ्यास गती असावी लागते. ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने दहावी परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

 ३) उच्च माध्यमिक शिक्षण १० वी नंतर पदवी व त्यानंतरचे  उच्च शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. साधारणतः कला, वाणिज्य व विज्ञान ही उच्च माध्यमिक शिक्षणाची मुख्य अंगे आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येते.

 

१० वी नंतरच्या संधी

Previous Next
३ ते २४ महिने कालावधी चे अभ्यासक्रम ३ ते २४ महिने कालावधी चे अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण हे अल्पावधीत नोकरी मिळविण्यासाठी तसेच छोटासा... Read more
किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कमी कालावधीतील अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी किंवा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान कौशल्यावर... Read more
क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे व... Read more
ऍप्रेंटीसशिप ट्रेनिग स्कीम उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे व... Read more
तांत्रिक शिक्षण उद्योगधंद्यांना लागणारे कुशल तंत्रज्ञ तयार करण्यासाठी दहावी नंतर ३ वर्षांचे व १२ वी (विज्ञान)... Read more
उच्च माध्यमिक शिक्षण दहावी नंतर पदवी व त्यानंतरचे  उच्च शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. साधारणतः कला, वाणिज्य... Read more
शैक्षणिक संधी शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे असं सरकारला कायद्याने सांगण्याची गरज पडते, यावरूनच शिक्षणाबद्दलची... Read more
१० वी नंतरच्या संधी हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना नेहमीच पडलेला असतो. दहावीच्या प्रमाणपत्रावर आजच्या काळात नोकरी... Read more
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण एखाद्या व्यवसायात कमी कालावधीत प्रवेश करावयाचा असल्यास ३ ते २४ महिने कालावधीचे व्यावसायिक शिक्षण... Read more

 

 

Site Search

Mobile Alerts

Get Mobile Alerts

तुमचे पूर्ण नाव व मोबाईल नंबर लिहा



सुविचार

"We must never be afraid to go too far, for success lies just beyond."
Marcel Proust

Archive

Like on Facebook

Website Visitors

Today23
Yesterday157
Week315
Month1989
All11566

Currently are 5 guests and no members online

प्रश्न विचारा व बक्षिसे जिंका